🕒 1 min read
सोलापूर: जिल्ह्यात काल (१३ मार्च) काँग्रेस विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कारभारावर नाराजी जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना उर्जामंत्री करा अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील (Congress Leader Dhawalsinh Mohite Patil) यांनी ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे.
नाना पटोले जर उर्जामंत्री झाले तर शेतकऱ्यांचे वीज कट लांब शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाल्याशिवाय राहणार नाही. असेही धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. सोबतच आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद द्या, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्यावर नाराजी असतात ही मागणी वेगळ्याच चर्चांना उधान देऊन गेली आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी अडचणीत आणत असल्याचा आरोपही सोलापूर काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ही मागणी काँग्रेस- राष्ट्रवादीत फुट पडत आहे काय? या चर्चांना उधान देत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘तो धोनी सारखा कुल’ म्हणत इरफान पठाणने केली ‘या’ खेळाडूची प्रशंसा
-
“इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष…”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
-
“फडणवीसांना कोणत्याही कटात अडकवण्याचा संबंध नाही”- दिलीप वळसे पाटील
-
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
-
मुस्कान खानच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली!

