Share

पेंग्विन जबाबदारीच्या खर्चात वाढ; पालिकाला मोजवे लागणार 45 लाख रुपये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेच्या (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) पेंग्विनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले होते. मात्र नवीन संस्थेच्या नियुक्तीसाठी विलंब होत असल्याने महापालिका प्रशासनाने जुन्याच कंपनीला दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यामुळे यासाठी लागणारा खर्च वाढणार आहे.

पालिका प्रशासनाने दिलेल्या या वाढीव कालावधीसाठी पालिका तब्बल 45 लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने मांडला आहे. मात्र खर्चाला आधीपासून सदस्यांचा विरोध असल्याने यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राणी बागेच्या नूतनीकरणादरम्यान 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. यासाठी राणी बागेत पेंग्विन कक्ष तयार केला आहे. या पक्ष्यांचे आणि कक्षाची व्यवस्थापन प्रणाली महापालिकेकडे नसल्याने 11 सप्टेंबर 2018 रोजी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची 36 महिन्यांकरिता नेमणूक केली होती. ही मुदत 30 सप्टेंबर 2021 रोजी संपुष्टात आली. यासाठी मागविलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

नवीन कंपनीची निवड न केल्याने प्रशासनाने मुदत संपुष्टात आलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला आणखी 45 दिवसांचा कालावधी वाढवून दिला. हा कालावधी 15 नोव्हेंबर 2021 रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही नवीन कंपनी न मिळाल्याने स्थायीने 2018 मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे मुदतवाढ दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!