पुणे : पुण्यातल्या रेस्टाॅरंट्स , बार , आणि फुड कोर्ट मध्यरात्री एक पर्यंत सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्याचे निर्बंध शिथिल करणारे आदेश काढले आहेत. त्यामध्ये ही सुट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याच बरोबर मद्यविक्री साठीही रात्री साडेदहा पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातले हाॅटेल्स ११ ला बंद केले जात होते. लवकर बंद करायचे आदेश असल्याने अनेक हाॅटेल्स मध्ये ग्राहकांना १०:३० पर्यंतच सेवा दिली जात होती. आता मात्र रात्री १ पर्यंत हाॅटेल सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे
हळूहळू पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. दुकाने सुरुवातीला अटीसापेक्ष मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली.
राज्य सरकारने एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. इक्बालसिंह चहल यांनी राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- मुलगा आणि पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी; एक वर्षानंतर झाला उलगडा
- “झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता जनतेची माफी मागावी
- प्लॅस्टिक कचरा विल्हेवाटप्रकरणी पतंजलीसह कोक, पेप्सी, बिसलेरीला कोट्यवधींचा दंड !
- ‘माझ्या मुलांनी तीन दिवसांपासून बोलणं सोडलंय, मी तुमच्याविरोधात केस दाखल करणार आहे’


