Share

‘माझ्या मुलांनी तीन दिवसांपासून बोलणं सोडलंय, मी तुमच्याविरोधात केस दाखल करणार आहे’

Published On: 

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नेहमीच तोंडसुख घेत असतो. कधी संघाच्या खराब  कामगिरीवरुन तर कधी संघाच्या निवडीवरुन, क्रिकेट मंडळावर निशाणा साधत असतो. आता त्याने नुकताच पाकिस्तानी सुपर लीग अर्थात पीएसएलच्या नवीन अँथम साँगवर आणि हे गाणं बनवणाऱ्या व त्या गाण्याला परवानगी देणाऱ्या पीसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे त्याने या नवीन गाण्याची खिल्ली तर उडवलीच आहे, शिवाय तुम्हाला लाज वाटत नाही का असं गाणं बनवताना अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खरडपट्टी काढलीये. माझ्या मुलांनी तीन दिवसांपासून (गाणं ऐकल्यापासून) बोलणं सोडलंय, अशा शब्दांत शोएबने या गाण्याची जबरदस्त खिल्ली उडवली आहे.

“असं गाणं बनवणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे, मला तर हे समजत नाही की या गाण्याला पीसीबीने परवानगी कशी दिली…मला सांगितलं असतं…मी चांगलं गाणं बनवलं असतं…गाणं इतकं घाण आहे की माझ्या मुलांनी ३ दिवसांपासून बोलणं सोडलंय. तुम्ही लहान मुलांना घाबरवलं. मी तुमच्यावर खूप नाराज आहे आणि तुमच्याविरोधात केस दाखल करणार आहे” अशा शब्दात रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएबने  गाण्याची खिल्ली उडवलीये. तसेच, गाण्यात वापरलेला शब्द Groove चा काय अर्थ होतो हे तरी माहितीये का या शब्दाचा अर्थ नाली होतो, या शब्दाचा गाण्यात कसाकाय वापर करु शकतात, असा सवाल विचारत त्याने पीसीबीला धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!