Share

गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोना बाधितांचा उच्चांक! तर आतापर्यंत ६० हजारहुन अधिक मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशावर असलेले कोरोनाचे संकट हे अजूनही संपले नसून दिवसेंदिवस नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा उच्चांकाने वाढत आहे. गेले अनेक दिवस कोरोनामुक्तांचे वाढते प्रमाण हे जरी दिलासादायक असले तरी कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा देखील धोकादायक आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. यापैकी ७,२५,९९१ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २५,२३,७७२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या ३५ कोटींच्या धमकी प्रकरणी एकाला अटक

आतापर्यंत देशभरात कोरोनाने ६०,४७२ लोकांचा जीव घेतला आहे. तसेच २६ ऑगस्टपर्यंत देशभरात ३,८५,७६,५१० कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ९ लाख २४ हजार ९९८ नमून्यांची काल (बुधवारी) तपासणी झाली, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंनी रोखलेली विकासकामे तत्काळ सुरू करा, या आमदारांची आहे मागणी

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. बुधवारी राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक १४,८८८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७,१८,७११ इतकी झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या २३०८९ इतकी आहे.

हा तालुक्यातील सामान्य जनतेवर अन्याय- आ.लहू कानडे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!