Share

हा तालुक्यातील सामान्य जनतेवर अन्याय- आ.लहू कानडे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : श्रीरामपूर तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात पुढच्या महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कुटुंबांना गव्हासोबत मका दिली जाणार आहे. मात्र मका हे आपले अन्न नसल्याने मकेचे प्रमाण कमी करून गहू देण्याची मागणी काँग्रेस आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ह्या निर्णयामुळे तालुक्यातील सामान्य जनतेवर अन्याय होणार आहे असे मत आ.कानडे यांनी व्यक्त केले.

मध्यंतरी सरकारने शेतकऱ्यांची मका खरेदी केली. तीच मका आता रेशनवर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरसह चार तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये गव्हासोबत मका देण्यात येणार आहे . यात अंत्योदय योजनेचा लाभ घेत असलेल्या पिवळ्या रेशनकार्डधारकांना पुढच्या महिन्यात २५ किलो गव्हाऐवजी २० किलो मका व ५ किलो गहू मिळणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ घेत असलेले पिवळे व केसरी रेशनकार्डधारकांना दरमहा मिळणाऱ्या माणसी तीन किलो गहू ऐवजी आता पुढच्या महिन्यात प्रतिमाणसी दोन किलो मका व एक किलो गहू मिळणार आहे.

आपल्याकडील जनतेचे मका हे मूळ अन्न नाही. शिवाय तीच मका केवळ चारच तालुक्यांत का द्यायची इतर तालुक्यांना का नाही? अशी विचारणा आ.कानडे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांना केली आहे.

विनायक मेटेंमुळेच मराठा आरक्षणावर धोका निर्माण झाला असता ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा गंभीर आरोप

साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते ; चव्हाणांवर सामनातून घणाघात

अभाविपच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जची चौकशी करू : अब्दुल सत्तार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!