मुंबई : हिंदी चित्रपटांसह अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरन्ज त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली आहे.
महेश मांजरेकर हे हिंदीसह मराठी चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव आहे. अस्तित्व, दबंग, वॉन्टेड, काकस्पर्श यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाची व अभिनयाची भूमिका पार पाडली आहे. तसेच मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन देखील ते करतात. काल (दि. २६ ऑगस्ट) रोजी त्यांना अज्ञात इसमाचा फोन आला. यावेळी त्याने तब्बल ३५ कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी दिली. यानंतर महेश मांजरेकर यांनी लगेचच दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी देखील कारवाई करत एका खंडणीखोराला अटक केल्याचे समजते.
तुकाराम मुंढेंनी रोखलेली विकासकामे तत्काळ सुरू करा, या आमदारांची आहे मागणी
हा संशयित आरोपी खेडमधील रहिवासी आहे. तर, कुख्यात गुंड अबू सालेम गँगशी त्याचा संबंध आहे का? तसेच कोणत्या कारणास्तव त्याने हि धमकी दिली याबाबतची पुढील चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.
हा तालुक्यातील सामान्य जनतेवर अन्याय- आ.लहू कानडे


