🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.
मुंबई इंडियन्स या संघाने तब्बल ५ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं असून २०२१ मधील आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी देखील संघ उत्सुक असल्याचं मॅनेजमेंटकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने सोडलेल्या (रिलीज केलेल्या) खेळाडूंची नवे जाहीर केली आहेत. यामध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट व गेली अनेक सत्र मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या श्रीलंकन खेळाडू लसिथ मलिंगाला देखील डच्चू देण्यात आला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी बुधवारी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवली आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या जागी एखाद्या पात्र खेळाडूला मुंबई इंडियन्स संघात संधी मिळू शकते.
फ्रँचायझीने खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, ज्यानंतर मुंबई संघात मोठी जागा रिक्त झाली आहे. अशास्थितीत आगामी लिलावात मुंबईचे लक्ष मलिंगाची जागर भरून काढणाऱ्या गोलंदाजासाठी बोली लागवण्यावर असेल. मलिंगा मुंबई संघातील एक मुख्य आणि अनुभवी गोलंदाज होता. जसप्रीत बुमराहच्या साथीने आपल्या वेगवान हल्ल्याने विरोधी संघावर दोघे भारी पडले होते.
You gave us 170 moments to celebrate. But the most memorable ones came on the final ball of the match. You smiled, you bowled, you won and for that we say #ThankYouMalinga ????
— Mumbai Indians (@mipaltan) January 20, 2021
लसिथ मलिंगाची जागा घेऊ शकतो ‘हा’ खेळाडू
1. मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचे नाव या यादीत पहिले येते. स्टार्कने आपल्या वेगवान हल्ल्याने बड्या फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत. स्टार्कला आयपीएल खेळण्याचा अनुभवही आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ मलिंगाची जागा भरून काढण्यासाठी मिचेल स्टार्कला संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल.
2. मुस्तफिजुर रहमान
या यादीत बांग्लादेश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान दुसरा गोलंदाज आहे. रहमान यापूर्वीही मुंबई संघाचा सदस्य होता, परंतु गेल्या काही मोसमात राष्ट्रीय संघात प्राधान्य दिल्याने त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु रहमान पुन्हा एकदा आयपीएल खेळण्यास तयार असल्याने मुंबई त्याच्यावर मोठी बोली लावून त्याला संघात सामील करू शकते.
3. काईल जेमीसन
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा घातक युवा अष्टपैलू खेळाडू काइल जेम्सन यंदा आयपीएल लिलावात चांगलेच लक्ष वेधू शकतो. अलीकडच्या काळात जेम्ससनने किवी संघाकडून चांगली गोलंदाजी केली आहे. जेमीसनने किवी संघाकडून 4 टी-20 सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत, पण त्याचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता फ्रँचायझी त्याच्यात बोली लागवण्यासाठी उत्सुकता दर्शवू शकतात.
या खेळाडूंना संघाने केलं रिलीज
लसिथ मलिंगा, मिशेल मॅकलंघन, नॅथन कुल्टर-नाईल, जेम्स पॅटिन्सन, रुथरफोर्ड, लेग स्पिनर प्रिन्स बलवंत राय, फास्ट बॉलर दिग्विजय देशमुख या खेळाडूंना येणाऱ्या मित्रांसाठी कायम न ठेवता लिलावामध्ये सोडण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर भारतीय संघाकडे शार्दुलकर आहे’ ; सचिनशी तुलना करत ठाकूरला दिलं नवं टोपणनाव’
- …तर तो भारताचा एक प्रकारे अपमानच होईल : केविन पीटरसन
- वरुण धवन आणि नताशा दलाल अडकले लग्नबंधनात
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’
- ‘त्याच वेगवान गोलंदाजांना सतत खेळवणे ही…’ चॅपेल गुरुजींनी टोचले कांगारूंचे कान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
