🕒 1 min read
औरंगाबाद : शहराला भेडसावणारी मोठी समस्या आता दूर होणार आहे. दर पावसाळ्यात शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या जालना रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढता काढता जीव नाकीनऊ येतो. आता या रस्त्यावर साइड ड्रेन केले जात असून पाण्याचा निचरा होण्यासाठी हे ड्रेन कामी येतील. मार्च २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या निधीतून ही कामे सुरु आहेत.
जालना रोडवर हायकोर्टासमोर पावसाळ्यात पाणी साचते. नगर नाका ते केंब्रिज चौकापर्यंत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणाने ७२ कोटी रुपये खर्चाची विविध कामे हाती घेतली आहेत. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी देण्याची घोषणा केली होती.
त्यात जालना रोड आणि सिडको ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे बीड बायपास असे दोन प्रमुख रस्ते होते. मात्र, हे रस्ते बनवण्यापूर्वी मनपाने भूसंपादन करून देणे गरजेचे होते. परंतु, भूसंपादन करण्यासाठी पुन्हा निधीची अडचण सांगितल्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केवळ जालना रोड आहे तेवढ्याच रुंदीमध्ये डांबरीकरण, ओव्हर-ले, साइड ड्रेन आणि एक भुयारी मार्ग करून देण्याचे काम सुरू केले.
विमानतळ ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत केवळ साइड ड्रेन आणि पेव्हर ब्लॉकचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. केंब्रिज चौक ते नगर नाक्यापर्यंत १४ किलोमीटर लांबी, त्यापैकी बाबा पेट्रोल पंप ते नगर नाका, आणि विमानतळ ते केंब्रिज चौकापर्यंत (साडेचार किलोमीटर) डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे.
विमानतळासमोर भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. यामुळे जालना रोडवरून सरळ धावणारी वाहने विनाअडथळा जातील. तर विमानतळाकडे जाणारी किंवा येणारी वाहनेही विनाअडथळा मुख्य रस्त्यावर येऊ शकतील. भुयारी मार्ग, साइड ड्रेन आणि ओव्हर-ले या सर्व कामांसाठी एकच निविदा प्रक्रिया झालेली असून मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यातील किराणा दुकाने आता ‘या’ वेळेतच राहणार सुरु
- ‘अन्यथा, ऑक्सिजनचा आणखी तुटवडा निर्माण होणार’, राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
- नियमांचे काटेकोर पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा!
- पाच मोठ्या शहरात सक्तीचा लॉकडाऊन लावा, न्यायालयाचा योगी सरकारला दणका
- कोरोना रुगणांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्याव्यात – अमित देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

