लातूर: जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १९) रोजी शासकीय विश्रामगृहात लातूर जिल्हा प्रशासनाची कोविड आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य विभागाने हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ऑक्सिजनेट बेड, वेंटीलेटर सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून ठेवाव्यात असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. या बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्व नागरीकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे अतिशय आवश्यक आहे. कोव्हीड आजारावर आवश्यक असणारे रेमडिसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लँट, वेंटीलेटर मशीन,औषध व बेड बाबतची मागणी प्रशासनाकडे तात्काळ नोंदवावी. जेणेकरुन खासदार व आमदार निधी तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी भरीव मदत दिली जाईल. कोव्हीडच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी तात्काळ दिलेल्या सूचनांचा कृती आराखडा तयार करुन सादर करावा, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.
राज्यमंत्री बनसोडे यांनी उदगीर तालुका व परिसरातील कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जम्बो सिलेंडर, बेड्स, ऑक्सिजन व व्हॅटीलेटर मशीन तसेच औषधी मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांना मदत करु शकतो, असे सांगितले. यावेळी लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांनी ग्रामीण भागात उदभवणाऱ्या अडी-अडीचणीबाबत निवेदन पालकमंत्री देशमुख यांना देऊन मागणीप्रमाणे कोव्हीड सेंटर, यंत्र सामुग्री व अम्ब्युलंस उपलबध करुन देण्याची मागणी केली. या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कोव्हीडच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘गलिच्छ राजकारण करू नका, एक दिवस जनता तुम्हाला खड्ड्यात घालेल’
- ‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड
- कचरा टाकणाऱ्यांविरोधात बारापुल्ला गेटलगत बसवल्या लोखंडी जाळ्या!
- कोरोना : लसीकरण गरजेचे, नागरिकांनी सहभाग घ्यावा : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
- ‘राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

