वैजापूर : तालुक्यातील कोरोना विषाणुचे वाढते संक्रमण थोपविण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या तोकड्या आरोग्य यंत्रणेची जाणीव करून देत यंदाच्या रमजान महिन्यात राज्य शासनाने निर्देशित केलेल्या नियमांंचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे एकमुखी आवाहन रविवारी (दि.१८) पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित एका बैठकीत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना केले.
या बैठकीला आमदार रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी आदी उपस्थितीत होते. यावेळी रमजान काळात संध्याकाळच्या सुमारास खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी फळे व इतर साहित्य विक्री करता येणार आहे. तशी व्यवस्था प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.
यापुढील काळात तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात भाजी मंडई भरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिवाय अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी १ व फळविक्रेते सकाळी नियोजित वेळेत तर सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत व्यवसाय करू शकतात. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रजापती यांनी दिली.
तहसीलदार राहुल गायकवाड यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, कोरोनोमुळे वर्षभरात तालुक्यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असेही सूचक विधान त्यांनी केले. दिवसेंंदिवस रुग्णसंख्या वाढत असून ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरची मागणी वाढत आहे. कोविड केंद्रांमध्येही पूर्ण क्षमतेने रुग्ण भरती झाले असल्याची माहिती देत प्रशासकीय सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन डॉ. दिनेश परदेशी यांनी केले. बैठकीला नगरसेवक, व्यापारी व मुस्लिम बांधव उपस्थितीत होते.
यावेळी बोलतांना आमदार रमेश बोरणारे म्हणाले, येथील उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नाही. याठिकाणी मोजके आरोग्यधिकारी व कर्मचारी सध्या आपल्या पूर्ण क्षमकेने आरोग्यसेवा देत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात फिजिशयन डॉक्टर उपलब्ध व्हावा. यासाठी पुरेपुर प्रयत्न केला मात्र अद्याप डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. या वर्षी जीव वाचण्यालाच महत्त्व असून नियमांचे पालन करून सण साजरा करा असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड
- कचरा टाकणाऱ्यांविरोधात बारापुल्ला गेटलगत बसवल्या लोखंडी जाळ्या!
- कोरोना : लसीकरण गरजेचे, नागरिकांनी सहभाग घ्यावा : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
- ‘राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा’
- देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कोरोनाची लागण ; एम्स रुग्णालयात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

