Share

राज्य सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे; लवकरच विमा कवच देण्याबाबत होणार निर्णय : राजेश टोपे

Published On: 

पुणे : गेले पाच महिने पुण्यासह राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत.  कोट्यवधी खर्चून जम्बो रुग्णालये उभारली पण आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने रोज अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेल्या उणीवा समोर आल्या आहेत. यानंतर राज्य सरकार, महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून राजकीय नेत्यांनी देखील आता त्वरित हालचाली सुरु केल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांचे अभिनंदन, मिळाला ‘दबंग’ पोलीस आयुक्त

पुण्यातील विधानभवनात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.5) करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकांरांशी संवाद साधला.

भाजप आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची लागण!

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्य शासन देखील पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून ५० लाखांच्या विमा कवच देण्याचा विचार अंतिम टप्प्यात आहे. तसेच याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी देखील या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुढील काळात कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी अधिकाधिक रुग्णवाहिका राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

‘त्यानं’ मला गाठलं…भाजपच्या नेत्याचा भावनिक संदेश!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!