Share

पारनेरच्या सुनबाई बनल्या लेफ्टनंट कर्नल!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर तालुक्यातील चिंचोलीच्या सुनबाई स्वाती दळवी पिंपरकर यांची सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर निवड झाली आहे. वडिल सैन्यात असल्याने आपणही सैन्यदलातच भरती व्हावे ही स्वाती यांची इच्छा होती. अनेक प्रयत्न करून सप्टेंबर २००४ ला त्या सैन्यात भरती झाल्या. सुरुवातीला लेफ्टनंट त्यानंतर कॅप्टन व नंतर मेजर या पदावर त्यांनी काम करून अखेर त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर संधी मिळाली आहे.

स्वाती दळवी पिंपरकर यांचा थक्क करणारा प्रवास आहे. सैन्यदलात एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या त्या तालुक्यातील एकमेव महिला आहेत. त्यांचे माहेर कोकणातील सावंतवाडीचे आहे. वडील कॅप्टन यशवंत दळवी सैन्यात असल्याने त्यांनाही देश सेवेची आवड निर्माण झाली. २००४ साली त्या पुण्यात सैन्यात दाखल झाल्या.

भाजप आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची लागण!

एका पाठोपाठ सलग तीन प्रमोशन मिळून आता त्या उच्च पदावर पोहोचल्या आहेत. त्यांचे पती संदिप राजाराम पिंपरकर हे देखील सैन्य दलात मेजर पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर सध्या ते खाद्य सुरक्षा विभागात दिल्ली येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांचे अभिनंदन, मिळाला ‘दबंग’ पोलीस आयुक्त

सैन्यदल हे केवळ पुरुषांसाठीच असते अशीच समाजाची धारणा आहे. परंतु सैन्यदलात वैद्यकीय, अभियांत्रिकी, दूरसंचार असे विविध विभाग असल्याने युवती व महिलांना मोठी संधी आहे. यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. सकारात्मक विचार ठेवून इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन युवतींनी सैन्यदलाकडे वळावे यासाठी वडील किंवा पतीने प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत लेफ्टनंट कर्नल स्वाती दळवी पिंपरकर यांनी व्यक्त केले आहे.

‘त्यानं’ मला गाठलं…भाजपच्या नेत्याचा भावनिक संदेश!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!