Share

भाजप आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची लागण!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला शहरात पसरणारा कोरोना विषाणू आता गाव खेड्यातही फोफावतोय. सामान्य नागरिकांसोबत राजकीय नेते व लोकप्रतिनिधींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारी सायंकाळी त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आमदार मोनिका राजळे अनेक दिवसांपासून मतदार संघात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाला सोबत घेऊन लोकांना सतर्क करत होत्या. विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक आमदाराला कोरोनाची चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार शुक्रवारी मोनिका राजळे यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली.

पिंपरी-चिंचवडकरांचे अभिनंदन, मिळाला ‘दबंग’ पोलीस आयुक्त

शनिवारी सायंकाळी हा अहवाल आला असून,त्या अहवालानुसार त्या कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आ.राजळे तातडीने अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. परंतु, त्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना आपल्या घरीच राहून उपचार घेण्यास सांगितले आहे.

‘त्यानं’ मला गाठलं…भाजपच्या नेत्याचा भावनिक संदेश!

आमदार मोनिका राजळे यांची प्रकृती सध्या स्थिर असून, अहमदनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्या उपचार घेत आहेत. आ.राजळे ह्या कोरोना बाधित झाल्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात त्या सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. मात्र, त्यांच्या गाडीचे वाहनचालक व स्वीय सहाय्यक यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!