Share

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पाहणी करून उपाययोजना करावी; शरद पवारांचे निर्देश 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यसरकारमध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच २०१९ च्या विधानसभेमध्ये निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या सदस्यांची काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सुचना पवार यांनी केली आहे.

दरम्यान, या सूचनेनुसार तात्काळ पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राज्यसरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणारे प्रश्न निश्चित सोडवले जातील मात्र इंधन दरवाढ, गॅसदरवाढ असे प्रश्न केंद्रसरकारच्या अखत्यारीतील आहेत त्यावर कोविड नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्यावर निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

या बैठकीत सर्व सदस्यांनी आपल्या स्थानिक भागातील प्रश्न पक्षासमोर मांडले. तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांवर अनेकांनी आपली मते मांडली. यावर राज्यसरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना दिले.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!