Share

तब्बल नऊवर्ष लहान असलेल्या ‘टप्पू’ला बबिता करतेय डेट

Published On: 

मुंबई : तेरा वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. सध्या या शोमधील बबिता आणि टप्पू यांची रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर झाली आहे.

‘तारक मेहता..’ शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात विशेष स्थान मिळविले आहे. मात्र या शोच्या कलाकारांबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी एका व्यक्तीला डेट करत आहेत. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत (टप्पू)आहे. मुनमुन दत्तापेक्षा तो तब्बल नऊवर्ष लहान आहे.

दोघेही आजकाल एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आहेत. बऱ्याच काळापासून, राज आणि मुनमुन दत्ताच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि कमेंट याकडे लक्ष वेधत होत्या. सोशल मीडिया नेटकऱ्यांना अनेकदा मुनमुनच्या फोटोंवर राज यांच्या प्रतिक्रिया दिसल्या. आता हे स्पष्ट झाले आहे की दोघेही चांगल्या मित्रांपेक्षा जवळ आहेत. दोघेही आजकाल एकमेकांच्या प्रेमात असून त्यांची प्रेमकथा चांगलीच गाजत आहे. विशेष म्हणजे राज अनादकत (टप्पू )हा तब्बल नऊवर्षांनी लहान आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीममधील प्रत्येक सदस्याला दोघांमध्ये काय चालले आहे याची जाणीव आहे. या बाबत त्यांच्या कुटूंबियांना देखील माहीतअसल्याचं ही बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!