🕒 1 min read
नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काळजीवाहू सरकारची घोषणा केली आहे. सर्व पूर्णपणे पुरुषांच्या असलेल्या या सरकारच्या प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद हे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून असतील. तालिबानचे प्रमुख हिबातुल्ला अखुंदझदा हे सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असतील.
तर या सरकारमध्ये अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले आहे. भारताला नंबर -1 शत्रू मानणाऱ्या सिराजुद्दीन हक्कानीचा एफबीआयच्या हिटलिस्टमध्ये समावेश आहे. दरम्यान आता चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे.
अफगाणिस्तानमधील अराजकता समाप्त करण्यासाठी आणि योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला मदतीची गरज असून, यासाठी अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान सरकारला ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा चीनकडून करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
तालिबानच्या सत्ता स्थापनेवर जागतिक स्तरावरून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट झाली नसून, तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आताच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीत असल्याचे दिसत आहे. त्यातच तालिबान सरकारला चीनेने केलेल्या या मोठ्या मदतीमुळे सर्वच अवाक् झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..तर मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनाला बसायला तयार’, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
