मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. राज्यपाल यांचं आज अभिभाषण होतं, अभिभाषण सुरू असताना अर्धवट सोडून राष्ट्रगीताची वाट न बघता राज्यपाल निघून गेले. या आजच्या अधिवेशनातील राज्यपालांच्या वागण्यावर रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे नेते असं बोलत आहेत की, महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केल्यामुळे राज्यपाल महोदय लवकरात लवकर त्यांचे भाषण संपवून निघून गेले. पण राज्यपाल जेव्हा आले व त्यांच्या आसनापर्यंत पोहचत होते. आम्ही सर्व थोर व्यक्तींची नावे घेऊन घोषणा करत होतो. राज्यपाल बोलायला लागले तेव्हा भाजपच्या आंदोलकाने उठून तिथे राजकीय आंदोलन केले. मला असा प्रश्न लोकांना करायचा आहे की जेव्हा आम्ही थोर व्यक्तींच्या घोषणा करत होतो, ते एकूण भाषण समाप्त केले की भाजपच्या लोकांच्या घोषणा एकूण निघाले? – रोहित पवार
मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे वागणे कितपत योग्य – रोहित पवार
तुम्ही भाषण एकले असेल, जे काही ते व्यक्तींवर बोलले ते कुठे वाचलं असे प्रश्न लोकांना पडत आहेत. आतापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली त्यावरून, राज्य पाल हे भाजपची भूमिका घेत आहेत की काय? असा हा प्रश्न आम्हा सर्वाना पडू लागला होता. भाषण झाल्यानंतर नियमाप्रमाणे राष्ट्रगीत होते, राष्ट्रगीतला न थांबता निघून गेले. हे सर्व पाहून खरच मनामध्ये खंत वाटतेय. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे वागणे कितपत योग्य आहे?
आज पहिल्यांदा विधी मंत्री मंडळाच्या इतिहासात घडत आहे, ज्यामध्ये राज्यपाल भाषण सोडून गेले. एवढेच नव्हे तर राष्ट्रगीताची वाट देखील पाहिली नाही. एवढेच नव्हे तर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई व जोतिबा फुलेंचा सुद्धा अपमान केला असे बोलत सत्ताधारी पक्ष आक्रमक झाले. ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही केल्या गेल्या.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

