Share

OBC Reservation : आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले- प्रसाद लाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले, असेही ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसाद लाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका व्हायला नकोत, राज्य सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून, आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे. आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे’, असे लाड म्हणाले आहेत.

दरम्यान, याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून राज्य सरकार कोणतेही उत्तर सुप्रीम कोर्टात देऊ शकले नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल आला असून अंतरिम अहवालाच्या नावाने कोणताही तर्क नाही, आकडेवारी नाही.’ तसेच ओबीसी समाजाची ही थट्टा आहे. तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका आम्हाला मान्य नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!