Share

राज्यपालांना दिल्लीतून फोन आल्यावर त्यांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

Published On: 

मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारीत अद्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

जेव्हापासून केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यपालांची खुर्ची चालते. हे अनेकदा त्यांच्या कृतीतून सिद्ध होत असतं. महाराष्ट्रातच नाही तर इतर पक्षाचं सरकार आहे तिथे सरकार अस्थिर करण्याचे काम राज्यपालांकडून सुरू असते. आता ज्या 6 जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या आहेत त्या पोटनिवडणुका ओबीसी आरक्षण अबाधित ठेवूनच झाल्या असत्या. पण राज्यपालांना दिल्लीतून फोन आल्यावर त्यांनी सही केली असावी, असा टोला नाना पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेचं स्वागत आहे मात्र त्यांनी हा निर्णय जर दोन दिवसांपुर्वी घेतला असता तर न्यायालयात भूमिका मांडणं सोप्प झालं असतं, असंही नाना पटोले यांनी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!