नाशिक: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील बापूराव गुंड यांनी पायी उलटे चालत अनोखे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मंजूर करावे, मतदारांना मतदान करण्यासाठी सक्ती करण्यात यावी, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या विविध मागण्या घेऊन पुण्यातील बापूराव गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलटे पायी चालत अनोखे आंदोलन सुरू केले आहे. आज ते येवला शहरात आले असता आपल्या विविध मागण्यांसाठी ते दिल्ली येथे निवेदन देणार आहेत तसेच त्यानंतर बापूराव गुंड हे जंतर मंतर येथे उपोषण देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून…”, फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
-
शेन वॉर्नच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे चाहत्यांना आवाहन म्हणाला “आरोग्याला…”
-
पेट्रोल – डिझेलच्या किमतींमध्ये 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता…
-
रशियाने सोशल मिडीयावर डागली ‘क्षेपणास्त्रे’; अनेक अॅप्सवर बंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
