Share

सरकार नाकर्तेपणा लपवण्यासाठी लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे – भाजप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते राम कदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. राम कदम यांनी आज पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता राम कदम यांना खार पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले आहे. यानंतर भाजप नेत्यांनी निषेध नोंदवत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘पालघर घटनेला २११ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप ही या नाकर्त्या राज्य सरकारला यावर कोणतीही कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ आज भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सकाळी घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण देत ताब्यात घेतले! यात्रा सुरु होण्यापूर्वीच झालेल्या या अटकेचा निषेध आम्ही करतो. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे सरकार लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे.’

यासोबतच, ‘राज्यात राज्य सरकार विरूद्ध बोलणे आणि आंदोलने करणे म्हणजे पाप आहे. तसे केल्यास दंडुकेशाहीचा वापर करण्यात येतो. राज्यात सरकारविरुद्ध बोलल्यास पत्रकारांना अटक, कधी निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण अशाप्रकारे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करण्याचे काम हे सरकार करत आहे.’ अशी टीका भाजपतर्फे करण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!