Share

ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर बोलू नये;राऊतांचा मनसेला टोला

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या मुद्दावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करून आज पुन्हा एकदा शिवसेनावर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा फोटो शेअर केला असून ‘स्मारक की मातोश्री 3?’ असा खोचक सवाल थेट सेनेला विचारला आहे.

‘जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी केले आहेत.

दरम्यान, आता  शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!