मुंबई : भाजप नेते राम कदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. राम कदम यांनी आज पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता राम कदम यांना खार पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले आहे. यानंतर त्यांनी पञकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘हे घाबरट महाराष्ट्रातील सरकार आहे. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने सरकारला आमचा आवाज दाबता येणार नाही. हा संघर्ष सर्व जनतेचा व साधू संतांचा आहे. कोरोनामुळे लोक रस्त्यावर उतरले नाहीत. मात्र आता सर्व साधू संत, आखाडे रस्त्यावर उतरतील. यासोबतच ते या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा अशी मागणी करतील. राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांना वाचवण्याची धडपड महाराष्ट्र सरकार करत आहे.’ असा घणाघात राम कदम यांनी केला आहे.
तर, ‘आदिवासी बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. हे डरपोक सरकार आहे. अशा धमक्यांना भाजपचा कार्यकर्ता घाबरत नाही’ असं म्हणत हे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही सगळं आयुष्य मज्जीदमध्ये घालवू पण राम कोणी मनातून काढू शकणार नाही ; कंगणा रनौत
- ‘करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले, वाढीव वीजबिल हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा’
- ‘गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज…’
- ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर बोलू नये;राऊतांचा मनसेला टोला
- कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन दिल्लीकडे रवाना

