मुंबई : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावलाय. राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनाबाबत जशी काळजी दाखवली तशीच काळजी दाखवत विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार अधिवेशन घेण्यासाठी घाबरत आहे. अशी टीका भाजपने याआधी केलेली होती या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले कि, ‘सरकारला घाबरण्याचं कारण नाही. थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल. आम्ही केलेली काम अधिवेशनात ठामपणे मांडणार आहोत.’ असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.
अनिल परब यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या १२ जागांची आठवण करुन दिली. यावेळी ते म्हणाले कि, ‘राज्यपालांचं पत्र आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या रिक्त जागेवर निवडणूक घ्यावी, असं ते पत्र आहे. कॅबिनेटमध्ये कधी निवडणूक घ्यायची ते ठरवू आणि त्यांना कळवू. त्यांनी आम्हाला एका जागेची आठवण करुन दिली. राज्यपालांनी १२ जागांची घोषणा अधिवेशनापूर्वी होईल असे वाटते. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरल्यानंतर राज्यपालांना काय कळवायचे ते कळवण्यात येईल.’
तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावलेला शाहरूख खान कोण आहे?
- पूजा चव्हाण प्रकरणातील संजय राठोड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- फर्दापूर येथे दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिके
- ‘अजित पवारांना विचारून मुख्यमंत्री राजीनामे स्वीकारतात का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

