Share

‘इथलं सरकार भक्कम आहे भाजपने आता #JobKiBaat केली पाहिजे’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओ कार्यक्रम मन कि बात मधून देशवासियांशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशात सुरु असलेल्या अनेक विषयांवर बोलत असतात. यावेळी या कार्यक्रमाच्या 74 व्या एपिसोडचं प्रसारण झाल.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्रतिबंधक नियमांचं पालन सर्वांनी करावं, असं मोदी यांनी म्हटलं. पाणी वाचवण्याचा संदेश सर्वांना दिला. माघ महिन्यापासून भारतात उन्हाळ्याची सुरुवात होते. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे आपल्या सर्वांना पाणी जपून वापरावं लागेल. पाणी हेच जीवन आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

यावरून महिला व बाल विकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर देखील टीका केले आहे. ‘एक मन की बात रेडीयोवर आणि दुसरी मन की बात फेसबुक वर सुरु आहे. भाजपने आता #JobKiBaat केली पाहिजे. बाकी इथलं सरकार भक्कम आहे, सक्षम आहे.’ देवेंद्र फडणवीस यांनी काळजी करू नये.’ अस ट्वीट करत त्यांनी निशाणा साधला आहे.

या कार्यक्रमा आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ‘राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘हिम्मत है तो करो – #KisanKiBaat #JobKiBaat’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!