Share

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या एप्रिल-मे मध्ये घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी, राज्य बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा मार्च-एप्रिल महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर परीक्षांच्या संभाव्य तारखा देखील जाहीर केल्या होत्या.

दिनांक २२/०२/२०२१ पर्यंत मंडळाने शिक्षक, पालक, विद्यार्थी व संघटनांकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचना प्राप्त झाल्यानंतर आता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितलं आहे.

तर, कोणताही दिव्यांग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखनिक आणि वाचनिकाची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दहावी-बारावीच्या अंतिम तारखा –

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये अनुक्रमे २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ आणि २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी – http://mahahsscboard.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!