🕒 1 min read
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
मात्र, संजय राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अद्यापही ते पदावर कायम आहेत. राठोड यांनी २३ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे जाऊन संत सेवालाल महाराज व देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संबंधी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. यात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं सूचक तितकंच रोखठोक ट्विट राऊत यांनी केलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची गच्छंती होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असं लिहिलेला महाराजांचा फोटो, राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्यावतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय.
महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांज्याच्या पाटलाला शिक्षा करणारे महाराज कुठे आणि संजय राठोड- पूजा चव्हाण प्रकरणी नुसत गप्पच नाही त्याच्या सोबत कॅबिनेट मध्ये बसणारे कुठे? कशाला महारांजाच्या राजधर्माची आठवण करताय आता फक्त सत्ताधर्म सुरू राज्यात https://t.co/4qZOtSo1VX
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 28, 2021
दरम्यान, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत राऊतांच्या ट्वीटचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांज्याच्या पाटलाला शिक्षा करणारे महाराज कुठे आणि पूजा चव्हाण प्रकरणी नुसत गप्पच नाही तर संजय राठोड यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये बसणारे कुठे? कशाला महारांजाच्या राजधर्माची आठवण करताय?’, असा सवाल करत राज्यात फक्त सत्ताधर्म सुरू असल्याचा घणाघात उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धूम स्टाईलने दोन व्यापाऱ्यांना १५ लाखांना लुटले
- कुंबळेंचा विक्रम मोडण्याची संधी ; अश्विन म्हणतो, “फार पुर्वीच रिकॉर्ड्सचा विचार करणं सोडलं”
- वेगवेगळ्या घटनेत मारहाण
- कंपनीतून केबल चोरणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी
- धक्कादायक! न्यायालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या व्यक्तिचा आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
