Share

“ठाकरे सरकार फार घाबरट म्हणून रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात संचारबंदी लावली”

Published On: 

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रात राजयकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या सर्व नाट्यादरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. राणेंच्या अटकेनंतर सिंधदुर्गमध्ये संचारबंदी लावण्यात आली. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकार फार घाबरट आहे. रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात त्यांनी संचारबंदी लावली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना केवळ सिंधुदुर्गात संचारबंदी का?राणे जी यांच्या यात्रेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाला. पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत आहे. ती हरली तर काय राहणार यांच्याकडे?, असा सवाल करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आमची जबाबदारी नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्यावेळी शेकडो लोकं नारायण राणे यांच्या घरासमोर जमा होतात, तेव्हा कायदा व सुव्यवस्था कुठे असते? राणे यांचे घर फोडायला गेलेल्या लोकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिनंदन करतात, हेच दुर्दैव आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!