Share

विराट सोबत अनुष्का-वामिका जाणार इंग्लंड दौऱ्यावर ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट येत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला आपल्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच त्यांची पत्नी देखील इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड 4 ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा आहे. टीम इंडिया सुमारे चार महिने दौर्‍यावर असणार आहे. त्यामुळे आता विराटसोबत अनुष्का आणि वामिका देखील इंग्लंड दौऱ्यावर असणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!