पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहेत. खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमज रुपाला यांच्याकडे केली.
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून सातत्याने खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या कमी होत असून १९९७ पासून २०१८ पर्यंत जवळपास बैलांची संख्या २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर २०१९ ही संख्या २९.६३ इतकी कमी झाली असून सोळावी पशुगणना ते १९ वी पशुगणना या काळात ४५.६७ टक्क्यांनी बैलांची संख्या कमी झाली असल्याकडे पुरुषोत्तमज रुपाला यांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्राच्या ग्रामिण संस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्या यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्याकडे केली. pic.twitter.com/CT0mxVbJLv
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 5, 2021
वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या ‘बैल’ प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी खा. @kolhe_amol यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. pic.twitter.com/gdCKczBdIx
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 5, 2021
भेटीबाबत माहिती देताना खासदार कोल्हे म्हणाले की, ‘बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीबाबत रुपाला यांना माहिती दिली. यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी बैलांची कशी काळजी घेतात हे केंद्रीय मंत्र्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगितले. मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सह-सचिवांसमवेत बैठक आयोजित करुन एक पाऊल पुढे टाकले होते. आता विद्यमान पशुसंवर्धनमंत्री देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे असे कोल्हे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

