Share

पुणे सुपरजायंट्सच्या माजी कोचचा धोनीबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाला होता “मला सल्ले…”

Published On: 

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याच्या संघाच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. रवींद्र जडेजा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल आणि धोनी एक खेळाडू म्हणून खेळत राहील. धोनीसाठी हा हंगाम शेवटचा असू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये, धोनीने CSK सोबत विविध प्रशिक्षकांसोबत चांगले संबंध आणि सौहार्दही शेअर केले आहे. दरम्यान, रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे माजी विश्लेषक प्रशिक्षक प्रसन्ना अगोराम यांनी धोनीसोबतची एक धक्कादायक घटना शेआर केली आहे.

प्रसन्ना अगोराम यांनी सांगीतले, “मला आयपीएल (IPL) २०१६ मध्ये पुणे सुपरजायंट्ससाठी (RPS) महेंद्रसिंग धोनीसोबत (MS Dhoni) काम करण्याची संधी मिळाली तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. तेव्हा तो म्हणाला, ‘चला गप्पा मारू’ आम्ही पुणे स्टेडियममध्ये होतो आणि तो त्याचे पॅड घालणार होता. त्याने मला फिल्टर कॉफी मिळेल का असे विचारले. ‘हो ,’ मी उत्तर दिले. त्याने लोकांना तिथे फिल्टर कॉफी घेण्यासाठी बोलावले आणि नंतर माझ्याशी गप्पा मारत राहिला,”

प्रसन्ना यांनी पुढे सांगितले ‘बघा, मला माहित आहे की तुम्हाला या क्षेत्रात खूप अनुभव आहे आणि ते खेळाडू तुमच्यासारखे आहेत आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी तुम्हाला बोर्डात आणले आहे. तुमच्यासोबत काम करताना आनंद होत आहे,’ तो म्हणाला. प्रशिक्षक आणि खेळाडूंना सर्व माहिती आणि रणनीती द्या. प्रशिक्षकासह खेळाडूंसोबत रणनीतीच्या बैठका करा, परंतु माझ्याकडून तेथे असण्याची अपेक्षा करू नका आणि मी तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत मला कोणताही सल्ला देऊ नका. परंतु प्रशिक्षक आणि खेळाडूंशी तुमच्या सर्व संभाषणांबाबत ईमेल करा.” असे धोनी पुढे म्हणाला होता. धोनी दोनच सीजन पुणे सोबत होता. ज्यात एकदा कर्णधार असताना त्याने संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!