Share

Bharat Gogavale : “…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”, शिंदे गटातील आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दहिसर येथे निष्ठा यात्रादरम्यान शिवसैनिकांशी संवाद साधताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरी करत शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले होते. यावरच शिंदे गटातील भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“सेना-भाजपाने पुन्हा युती करून सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?”, असा खोचक सवाल भरत गोगावले यांनी विचारला आहे.

तसेच आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले असून  आम्हाला लाज बाळगण्याची आणि राजीनामा देण्याची गरज नाही. पूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!