वर्धा : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींकडेच कोरोना लढाईची सूत्रे सोपवावीत अशी मागणी केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने काळ्या बाजारात दीड हजार किंमतीच्या इंजेक्शनची विक्री ही ३० ते ४० हजारांना होत होती.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मोठी मदत होत आहे. ५ मे रोजी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यास सुरुवात झाली होती. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मिती करण्यास परवाना मिळाला आहे.
आता, या कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. एकूण १७ हजार इंजेक्शन वापरास सज्ज झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- …तर एक जबाबदार राज्य म्हणून तो आपला पराभव ठरेल; न्यायालयाची राज्य सरकारला चपराक !
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- पुण्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ! तर कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच
- ‘बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…’


