🕒 1 min read
पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम दिसून आला होता. एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. ती गेल्या काही दिवसांमध्ये २ हजारांच्या आत आली होती.
पुणे कोरोना अपडेट : गुरुवार १३ मे,२०२१
◆ उपचार सुरु : २५२२२
◆ नवे रुग्ण : २,३९३ (४,५४,४५७)
◆ डिस्चार्ज : ४,१३५ (४,२१,६७२)
◆ चाचण्या : १२,७३८ (२३,२६,३०२)
◆ मृत्यू : ५० (७,५६३)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/0bDKLDbmj1— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 13, 2021
मात्र, आज पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांचा आकडा २ हजार पार गेला आहे. यामुळे, हा आकडा अधिक वाढू न देता योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शहरात नव्याने २ हजार ३९३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनामुक्तांचा आकडा आजही नव्या बाधितांपेक्षा अधिक आहे. ४ हजार १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ५० नागरिकांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरात सध्या २५ हजार २२२ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- अभिनेता आरोह वेलणकरने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- ‘बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

