🕒 1 min read
दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता, शक्तिमान या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झालेल्या ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
याबाबत त्यांनी एक भावनिक पोस्ट करून माहिती दिली आहे. आधी मुकेश खन्ना यांच्याच निधनाच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. मात्र, हे खोटं असून आपण ठणठणीत असल्याचं ते चौकशी करणाऱ्यांना सांगत असतानाच त्यांच्या बहिणीच्या निधनाचे वृत्त त्यांना समजले. बहिण कमल कपूर यांना शेवटपर्यंत आयसीयू बेड मिळाला नाही आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर हादरून गेल्याच त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे.
https://www.instagram.com/p/COxtrRoJSVI/?utm_source=ig_web_copy_link
मुकेश खन्ना यांची पोस्ट –
‘काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूचे वृत्त खोटं आहे हे सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र मला अजिबात अंदाजा नव्हता की एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले़ तिच्या निधनामुळे मी हादरून गेलोय. माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 दिवस तिने कोरोनाशी लढा दिला होता. मात्र लन्ग्स कन्जेक्शनमुळे आम्ही तिला कायमचे गमावून बसलो. समजत नाही देव कोणता हिशोब चुकता करतोय? आज मी पहिल्यांदा आयुष्यात हादरलो आहे.’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- अभिनेता आरोह वेलणकरने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो
- ‘कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत हे पाहून मला आनंद होतो’
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

