🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्राची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे.
आता, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.
आता केशव उपाध्ये यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्यांना पक्षात कवडीची किंमत नाही अशा बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची जबाबदारी त्यांना काही मिळणार नाही. हातात छोटा मंजिरा घेऊन त्यांनी व माधवरावांनी आयुष्यभर “केशवा माधवा” हे भजन अखंड गात संन्यस्त व्हावं,’ असा खोचक सल्ला देखील मिटकरी यांनी दिला आहे.
ज्यांना पक्षात कवडीची किंमत नाही अशा बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची जबाबदारी त्यांना काही मिळणार नाही. हातात छोटा मंजिरा घेऊन त्यांनी व माधवरावांनी आयुष्यभर "केशवा माधवा "हे भजन अखंड गात संन्यस्त व्हावं.@TV9Marathi pic.twitter.com/SX44PrZCL5
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 13, 2021
काय म्हणाले होते उपाध्ये ?
‘लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली,’ असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- अभिनेता आरोह वेलणकरने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा
- UPSC ची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर; आयोगाने नवी तारीखही केली जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

