नवी दिल्ली : देशात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. यातच आता भारतात मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला दिलेलं कायदेशीर संरक्षण संपलं आहे. आयटी कायद्याच्या कलम 79 नुसार ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळते. या कलमानुसार ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानी किंवा दंड करण्यापासून सूट दिली आहे. परंतु आता कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरुद्ध पहिला गुन्हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे.
There are numerous queries arising as to whether Twitter is entitled to safe harbour provision. However, the simple fact of the matter is that Twitter has failed to comply with the Intermediary Guidelines that came into effect from the 26th of May.
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) June 16, 2021
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करत या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं. भारतीय संस्कृती आपल्या मोठ्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत राहिली आहे. सोशल मीडियावर एक लहानशी चूकही मोठं कारण ठरू शकते.
फेक न्यूजचा मोठा धोका आहे. यावर कंट्रोल करणं आणि रोखणं हा नव्या आयटी नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम होतो, परंतु याचं ट्विटरने पालन केलं नाही. ट्विटरवर भारतात कायदेशीर संरक्षणाचा हक्काबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडीओमधील वयस्कर व्यक्तीने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयस्कर व्यक्ती त्या लोकांना ओळखत होती. तसेच तिथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते.
या ठीकाणाहून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या लोणी येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण केल्याचे सांगितले गेले आहे. मात्र या व्हिडीओला ट्विटरने मॅन्युप्युलेटेड मीडिया टॅग दिला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?
- ‘हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका’
- नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
- डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सिराज का इशांत ? ; सचिनने दिले ‘हे’ उत्तर

