Share

नेट -सेट प्रश्नांची सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात

Published On: 

औरंगाबाद : तीस वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांना नेट-सेट प्रश्नाच्या अनुषंगाने लढा द्यावा लागत आहे. या प्रश्नांमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याची अंतिम सुनावणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, अशी माहिती नेट संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी दिली आहे.

नेट व सेट संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या प्रश्नासंदर्भात १९९८ पासून प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद काळे हे या प्रश्नांमध्ये लढा देत आहेत.  विद्यापीठ, यु.जी.सी. व राज्य शासन यांच्याकडे नियमीतपणे पाठपुरावा करून त्यांनी या प्रश्नांमध्ये विद्यापीठ व यु.जी.सी कडे यश मिळवले, मात्र सहसंचालक ,संचालक व उच्च शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे  शासनाने प्राध्यापकांची न्याय्य भूमिका मान्य केली नाही. या विरोधात नेट/सेट संघर्ष समितीच्या वतीने उपाध्यक्षा आशा बीडकर यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात २०१० मध्ये याचिका दाखल केली.

तीन वर्षांत  65 तारखा पूर्ण झाल्या. उच्च न्यायालयाने एक ऑगस्ट 2013 रोजी प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर देखील राज्य शासनाने प्राध्यापकांना न्याय न देता या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, सर्वोच्च न्यायालयाने देखील 18 नोव्हेंबर 2013 रोजी पुन्हा प्राध्यापकांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला. या अंतरिम आदेशानंतर राज्य शासनाने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे 2015 मध्ये संघर्ष समितीला आय ए दाखल करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2015 रोजी पुन्हा अंतरिम आदेश दिला. चार आठवड्यात अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाचा अवमान म्हणून गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी दिली.

या ऑनलाईन सुनावणीमध्ये नेट/सेट संघर्ष समितीचे ॲड. अमोल सूर्यवंशी यांनी अंतिम सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मूळ याचिकेला टॅग झालेल्या सर्व याचिकासह अंतिम सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे 30 वर्षापासून चा प्रलंबित नेट/सेट प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्यामुळे प्राध्यापक व नेट/सेट संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी या प्रकरणी समाधान व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!