🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बॉलिवुड चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरु लागल्याने टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. यादरम्यान अनेक रखडलेले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे.
याच पार्श्वभूमीवर फरहान अख्तरने त्याचा आगामी चित्रपट ‘तुफान’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या १६ जुलै रोजी अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे अनेकांनी या चित्रपटावर लव्ह जिहादचा आरोप लावला आहे. येत्या 16 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर सध्या ट्विटरवर #BoycottToofan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
https://twitter.com/BakdePrashant/status/1413812332107485186?s=20
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला असून. त्यात एक मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एकमेकांच्या प्रेमात आहेत असं दाखवण्यात आलं आहे. अनेकांनी हे लव्ह जिहाद पसरवत असल्याचा आरोपही लावला. ‘बॉलिवूडच्या निशाण्यावर फक्त हिंदूचं का? आणि लव्ह जिहादलाही प्रोत्साहन देत आहेत. तर हिरॉइन नेहमी हिंदूच का असते. असा सवाल देखील नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे लव्ह जिहाद :
लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करायला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद ; कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी?
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

