🕒 1 min read
नागपूर : अवयवदान सप्ताहाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिका आणि आय.एम.ए.च्या वतीने जनजागृती सुरू आहे. या कार्यक्रमाने प्रेरीत होऊन अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान केले. यामुळे तीन नागरिकांना जीवनदान तर दोन व्यक्तींची नेत्रज्योती यामुळे परत आली.
ज्यांचे अवयव दान करण्यात आले त्या व्यक्तीचे नाव दयानंद सहारे असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत. सहारे यांचा आरमोरी येथे अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. नागपुरातील मोहन नगर येथील विम्स रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शोकाकुल नातेवाईकांना विम्सच्या डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या अवयवयाचे दान करण्यासाठी प्रवृत्त केले. कुटुंबीयांनी मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एक किडनी न्यू इरा रुग्णालयात, एक किडनी व्होक्हार्ट रुग्णालयात तसेच फुप्फुस मेडिट्रिना रुग्णालयामध्ये दान करण्यात आले. मृत व्यक्तीचे डोळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दान करण्यात आले. हृदयासाठी चेन्नईच्या डॉक्टरांची चमू नागपुरात दाखल झाली होती. मात्र अधिक वय आणि कमजोर हृदय यामुळे हृदय दान करता आले नाही.
दरम्यान, महापौर दयाशंकर तिवारी यांनी सहारे यांच्या कुटुंबीयांचे व विम्समधील डॉक्टरांचे या कार्यासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले, मनपा व आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून जनजागृती करीत आहे. याचा हा प्रतिसाद आहे. त्यांनी नागरिकांना अवयवदान करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन याप्रसंगी केले. ते म्हणाले, सहारे यांच्यामुळे तीन लोकांना नवंजीवन तसेच दोन नागरिकांना डोळे मिळाले.
आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी सहारे परिवाराचे व डॉक्टरांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, अवयवदान करुन जीवन देता येते. नागरिकांनी मोठया प्रमाणात अवयवदान करायला समोर यायला हवे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वरा भास्करने तालिबान्यांची तुलना हिंदुत्वाशी केल्याने नेटकरी संतप्त
- स्टीव्ह स्मिथ आणि ऍरोन फिंच टी-२० विश्वचषकात पुनरागमन करणार?
- लॉर्डसवर शमीची ऐतिहासिक कामगिरी ; सचिन-कोहलीसह या दिग्गजांनाही टाकले मागे
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने होणार कर्ज पुरवठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

