Share

लॉर्डसवर शमीची ऐतिहासिक कामगिरी ; सचिन-कोहलीसह या दिग्गजांनाही टाकले मागे 

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात टीम इंडियाने १५१ धावांनी विजय मिळवला आहे. चौथ्या डावात भारताने दिलेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपुर्ण संघ १२० धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या डावात सुरुवातीला लागोपाठ तीन धक्के बसल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मोक्याच्या क्षणी पडझड थांबवत १०० धावांची निर्णायक भागीदारी केली. तसेच याच डावात एकवेळ भारताचा डाव लवकर अटोपण्याची शक्यता असताना भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी करत सामन्याचे चित्रच पालटले. शमीने या खेळीसह त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला.

मोहम्मद शमीने लॉर्डस मैदानावर अर्धशतक ठोकून  सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, ए.बी, डिव्हीलिअर्स यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. लॉर्डसवर कोहलीचा सर्वोच्च स्कोटर 42 आहे, तर सचिन तेंडुलकरचा 37, ए.बी. डिव्हीलिअर्सचा 43, रिकी पॉन्टिंगचा 42 आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस याचाही या मैदानावरील सर्वोच्च स्कोर 54 आहे, त्याला देखील शमीने मागे सोडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!