मुंबई : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वरा सोशल मिडीयावर अधिक सक्रीय असून अनेक विषयाबाबत ती आपले मत मांडत असते. यावरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. यावेळी तिने अफगाणीस्तानमधील मुद्यावरून स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे. यामुळे तिच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे.
https://twitter.com/1APandey/status/1427848460942778372?s=20
याविषयी स्वराने ट्वीट करत लिहिलं की, ‘आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही आणि आपण तालिबानच्या आतंकवादापासून पूर्णपणे तुटलो आहोत. आपण तालिबान्या आतंकवादापासून शांत नाही होऊ शकत आणि आपण सगळे हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होतो. आपले मानवीय आणि नैतिक मूल्य हे दडपशाहीवर आधारीत नसलेल पाहिजे’, तिने केलेले ट्वीट वादात सापडले असून यावर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
She has experienced "Hindutva terror". Now Government must send her to Afghanistan for 6 months to experience Taliban terror. Then she will be able to compare. #SwaraBhasker #ArrestSwaraBhaskar pic.twitter.com/SRjZ68uSY9
— Taurus Head???? (@iBhagavathi) August 18, 2021
एवढेच काय तर तिच्या या विधानानंतर अनेकांनी तर तिच्या अटकेचीही मागणी केली आहे. स्वराने हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत, तिला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं काही युझर्सनी म्हणत आहे. सध्या #ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड ट्विटरवर पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- सत्ता ताब्यात घेतलेल्या तालिबानला अमेरिकेकडून मोठा धक्का, घेतला मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

