नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन मोदी सरकावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी वारंवार प्रश्न विचारूनही केंद्र सरकारला अद्याप समाधानकारक खुलासा करता आलेला नाहीये. संसदेच्या अधिवेशनात सध्या या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे.
पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले असून पेगॅसस या स्पायवेअर वापराच्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.
‘माझ्याविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात, माध्यमांविरोधात, सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात पेगॅसस हत्याराचा वापर करण्यात आला. सरकारनं हे का केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही संसदेचं कामकाज रोखलेलं नाही. आम्ही आमचा आवाज बुलंद केला आहे. ज्या शस्त्राचा वापर दहशतवाद्यांविरोधात करायचा, त्याचा वापर आमच्याविरोधात का केला जात आहे? सरकारनं पेगॅसस का खरेदी केलं?’, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधी काँग्रेस चालवण्यास असमर्थ; पत्रकार परिषद घेण्यापेक्षा ते तक्रार का नाही करत ?’
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

