नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन मोदी सरकावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी वारंवार प्रश्न विचारूनही केंद्र सरकारला अद्याप समाधानकारक खुलासा करता आलेला नाहीये. संसदेच्या अधिवेशनात सध्या या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे.
पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले असून पेगॅसस या स्पायवेअर वापराच्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय.
राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपने आता प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर निशाणा साधलाय. ‘विरोधकांना केवळ काही घराण्यांना वाचवायचं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना फक्त राजकारणात आपले स्थान निर्माण करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या विकासाचा मार्ग निर्माण करायचा आहे. मात्र सध्या सुरु असलेले विरोधकांचे नाटक नागरिकांच्या चांगलंच लक्षात येतंय,’ असा हल्लाबोल संबित पात्रा यांनी केला.
पुढे ते म्हणाले, ‘मोदींनी महत्वाच्या समस्यांवर बैठक बोलावली असताना विरोधकांनी बहिष्कार टाकला. राहुल गांधींना कोरोना पेक्षाही रचलेला चित्रपट(पेगासस) महत्वाचा आहे. त्यांना जनतेच्या आरोग्याशी घेणंदेणं नाही. जर खरंच त्यांच्या फोनवर पाळत ठेवली गेली असेल आणि काही महत्वाचे असेल तर त्यांनी पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा तक्रार का केली नाही ? राहुल गांधींवर कशाला कोणी पाळत ठेवेल. ते काँग्रेस पक्ष सांभाळण्यास असमर्थ आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवून काय साध्य होईल ? असा खोचक सवाल देखील पात्रा यांनी उपस्थित करत गांधींना लक्ष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

