Share

Uday Samant । निवडणूक आयोगाची लढाई सुरूच राहणार; उदय सामंत आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आता निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट) पोट निवडणुकीसाठी नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे.तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. दोन्ही गटांना मिळालेल्या नाव आणि चिन्हांवरून अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मंत्री उदय सामंत यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत म्हणाले, ठाकरे गटानं कुठं जावं हा त्यांचा प्रश्न आहे. सकाळी नऊ वाजता ते कोर्टात जातात. अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा बंधनकारक असेल. समता परिषदेनं मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेलं चालेल का, असा सवाल उदय सामंत यांनी केला. निवडणूक आयोगाचा निर्णय दोन्ही बाजूला ऐकूण घ्यावं लागेलं. निवडणूक आयोगाची लढाई अद्याप संपलेली नाही. ही लढाई अजून सुरू आहे. या पोटनिवडणुकीनंतर मेरिट निवडणूक आयोगाला दाखविणार आहोत, असं ते म्हणाले.

समता पक्षाचा दावा नेमका काय?

निवडणूक आयोगाने पोट निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह (मशाल) आणि नावं (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिल आहे. परंतू 1994 सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने आयोगाने दिलेल्या ‘मशाल’ चिन्हावर केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ झाली असून, सगळीकडे एकच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला –

काही वेळापुर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ऋतुजा लटके शिवसेनेतील नेत्यांसोबत महापालिकेमध्ये गेल्या होत्या. यावेळी आजच आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती लटकेंनी केली होती. मात्र, महापालिकेने ही विनंती फेटाळत राजीनामा देखील फेटाळला आहे. अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!