Share

Aditya Thackeray । “शिंदेंच्या प्रकाराची कुजबूज तेव्हाच मिळाली होती”; आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेतच दोन गट निर्माण झाल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी याआधी देखील बंड करण्याचा इशारा दिला होता अशी चर्चा ऐकायला मिळत होती. यावर आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. एक दिड वर्षांपूर्वीच एकनाथ शिंदेच्या या सगळ्या प्रकाराची कुजबूज आमच्यापर्यंतही पोहोचली होती. पण लोकांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमुळे आमच्यात दरी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं.” असा गौप्यस्फोट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

गेले अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी गद्दारी केली असल्याचे आरोप ठाकरे गटाकडून रोज केले जातात. अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांकडून यावर खुलासे करण्यात आलेत. आज आदित्य ठाकरेंनीही याबाबत थेट भाष्य केलं आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आमच्या घरात साधारण एक ते दीड वर्षांपूर्वीच चर्चा झाली होती. त्यांच्या या सगळ्या प्रकाराची कुजबूज आम्हाला तेव्हाच मिळाली होती. गेल्या वर्षी आम्ही दावोस दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा २० मे रोजी उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, असं थेट विचारलं होतं. इतकचं नाही तर, नक्की काय गडबड सुरू आहे, असंही त्यांनी शिंदेंना विचारलं होतं,’ असा खुलासा आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.

पण, आम्ही जेव्हा कोणासोबत काम करतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. अनेक लोकांकडून आम्हाला एकनाथ शिंदेंबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत होत्या. त्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही. ते लोकं आम्हाला चुकीच्या गोष्टी सांगून आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा तर प्रयत्न तर करत नाहीत ना, या विचाराने आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असल्याच आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना चांगलाच सुनावलं. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारची मदत केली. त्यातले अनेक जण तर शपथा घेऊन आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचे असं सांगत होते. शपथा घेणाऱ्यांनेही आमच्यासोबत गद्दारी केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!