Share

‘वयोवृद्ध सर्व चांगल्या भूमिका अमिताभ बच्चन यांना देतात’: शरत सक्सेना

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेते शरत सक्सेना यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे, तसेच शरत यांना अनेक बड्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकतेच त्यांनी बॉलिवूडमधील वयोवृद्ध  भूमिकांबद्दल मोठं वक्तव्य केलं असल्याने त्यांची चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CRHKL2TMyyt/?utm_source=ig_embed&ig_rid=f8661ad8-b2dc-4a43-8cd8-064d47541526

एका मुलाखतीत ते म्हणाले की, ‘सिनेसृष्टी ही तरुणांची आहे. येथे वृद्ध व्यक्तींची गरज नाही आणि नशिबाने आम्ही मरतही नाही. आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. मात्र वृद्ध लोकांसाठी लिहिल्या गेलेल्या सर्व चांगल्या भूमिका अमिताभ बच्चन यांना दिल्या जातात. जे काही उरलं सुरलेलं असतं ते माझ्या सारख्या लोकांना दिलं जातं आणि मग अनेकवेळा आम्ही ते नाकारतो.’ असं म्हणत शरत सक्सेना यांनी बॉलिवूडमधील कामाबद्दल व्यथा मांडली आहे.

शरत सक्सेना वयाच्या ७१ व्या वर्षात देखील स्वत: फिट ठेवण्यासाठी मेहनत घेतात. यासाठी ते दररोज २ तास व्यायाम करतात. आजही त्यांची तब्येत तरूण वर्गाला लाजवेल अशी आहे. तरुण दिसण्यासाठी ते स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरत सक्सेना यांनी नुकतेच रिलीज झालेल्या ‘शेरनी’ सिनेमात  महत्वीची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!