मुंबई : जुन महिन्यात इंग्लंडमध्ये न्युझीलंड आणि इंग्लंड संघादरम्यान दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात आली. यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडुन पदार्पण करणाऱ्या ओली रॉबीन्सनने पदार्पणातच ७ गडी बाद करत सर्वाचे लक्ष वेधुन घेतले.
मात्र पदार्पणाच्या सामन्यानंतर ईसीबीने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन तातडीने निलंबीत केले होते. कारण काही वर्षापुर्वी त्याने काही वादग्रस्त ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये ओलीने एका विशीष्ट जाती समुदायाला उद्देशून भाष्य केले होते. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर त्याचे हे ट्विट समोर आले होते. यानंतर त्याने माफी मागितली होती. मात्र ईसिबीने त्याला तातडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निलंबीत केले होते.
यादरम्यान ईसीबीने या प्रकरणावर आपला निकाल आज ३ जुलै रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार ओली रॉबीन्सनला ८ सामन्याची बंदी घालण्यात आली. मात्र निलंबनानंतर इंग्लंड आणि न्युझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि टी-२० ब्लास्ट या स्पर्धेतील दोन सामन्यातून त्याने स्वत: माघार घेतली होती. त्यामुळे त्याला केवळ ५ सामन्याच्या बंदीच्या कारवाईला समोरे जावे लागणार आहे. तसेच त्याला २.८३ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरा समन्स ; सोमवारी हजर राहण्याचे दिले आदेश
- व्हॉट्सअॅपचे नवे फीचर; ‘हाय क्वालिटी’ व्हिडीओ पाठवणे होणार सोपे
- इंग्लंड क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव ; ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण
- बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
- ‘आयपीएल मुळे संघाला सॅमसारखा एक सुपरस्टार मिळाला’ ग्रॅहम थॉर्प
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

