नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी झाली. ही इमारत, देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दूरदृष्टीचा अविभाज्य घटक ठरणार असून या रूपाने, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला जनतेची संसद उभारण्याची एक महत्वाची संधी मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांना म्हणजेच 2022 मध्ये या इमारतीत ‘नव भारता’ च्या इच्छाआकांक्षांचे अनुरूप प्रतिबिंब त्यात असेल असं म्हटलं आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला असून यात संपूर्ण ‘भारतीयत्वाचा’ विचार सामावलेला आहे.या इमारतीचे बांधकाम सुरु होणे, आपल्या लोकशाही परंपरेतील सर्वात महत्वाची प्रक्रिया ठरेल. एकत्र येऊन नव्या संसद भावनाची इमारत बांधण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. ज्यावेळी, भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असेल, त्यावेळी ही नवी इमारत त्या क्षणाची साक्षीदार ठरेल, त्या क्षणापेक्षा अधिक सुंदर आणि अधिक पवित्र दुसरे काहीही असू शकत नाही, अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय.काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्विट करुन संसदेच्या नवीन इमारतीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलंय. नवीन इमारतीचं भूमीपूजन करण्याचा निर्णय ह्रदयद्रावक आणि संवेदनाहीन आहे. देश सध्या आर्थिक मंदीतून जात असताना भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात येत आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमात डिजे वाजविण्यासारखे आहे, असे शेरगील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; काँग्रेसचा हल्लाबोल
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील भाजप सरकार संकटात; राजकीय वादळाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

